श्री. धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार असून, महाराष्ट्राच्या सार्वजनिक आणि राजकीय क्षेत्रातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहेत. १३ एप्रिल १९७७ रोजी जन्मलेल्या त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून MBAचे शिक्षण घेतले आहे. ते राजसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र असून, सार्वजनिक जीवनाची प्रदीर्घ परंपरा असलेल्या मोहिते-पाटील कुटुंबाशी त्यांचा संबंध आहे.
त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून झाली. २००७ ते २०१० या काळात त्यांनी माळशिरस पंचायत समितीचे सभापती म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य आणि गटनेते म्हणूनही त्यांनी काम केले. या काळात ग्रामीण भागातील विविध प्रश्न, प्रशासन आणि विकासकामांशी त्यांचा जवळून संबंध आला.
२०२४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांच्या उमेदवारीवर माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवत १८व्या लोकसभेत प्रवेश केला. खासदार म्हणून माढा मतदारसंघातील विविध प्रश्न संसदेत मांडण्याचे काम ते करत आहेत....
आम्ही लऊळकर परिवारातर्फे अभिमानाने व आदराने हे सन्मानपत्र श्री धैर्यशील मोहिते-पाटील यांना प्रदान केले जात आहे.
लऊळ गावाचा हा सुपुत्र / सुकन्या आपल्या कार्यकर्तृत्वाने सदैव आमच्या हृदयात राहील.