श्री. महादेव डांगे हे माढा तालुक्यातील लऊळ गावातील आगळेवेगळे आणि जिद्दी व्यक्तिमत्त्व असून, प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करत त्यांनी सुमारे चार दशकांहून अधिक काळ देश-विदेशातील दुर्मीळ पोस्टाच्या तिकिटांचा अनोखा संग्रह जपला आहे. त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण छंदाची माध्यमांनीही विशेष दखल घेतली आहे.
शालेय जीवनात चौथीत शिकत असताना त्यांना एक जुने पोस्टाचे तिकीट मिळाले. या तिकिटाचे वेगळेपण आणि त्यामागील इतिहास समजल्यानंतर त्यांना तिकिटे जमा करण्याची आवड निर्माण झाली. पुढे परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यांनी हा छंद सोडला नाही. विविध ठिकाणांहून जुनी आणि दुर्मीळ तिकिटे मिळवत त्यांनी आपला संग्रह सातत्याने वाढवला.
उपजीविकेसाठी मजुरी करत असतानाही त्यांनी या छंदाची जोपासना सुरूच ठेवली. तरुणपणी पुण्यात कामासाठी गेल्यानंतर ते जुन्या पाकिटांवरील तिकिटे मिळवून ती आपल्या संग्रहात जतन करत असत. पुण्यातील एका निवृत्त अधिकाऱ्यानेही त्यांना जुन्या तिकिटांचा संग्रह दिला. त्यातून भारत, पाकिस्तान, इंग्लंड, फ्रान्स तसेच आफ्रिकेतील विविध देशांतील जुनी आणि दुर्मीळ तिकिटे त्यांच्या संग्रहात जमा झाली....
आम्ही लऊळकर परिवारातर्फे अभिमानाने व आदराने हे सन्मानपत्र श्री. महादेव डांगे यांना प्रदान केले जात आहे.
लऊळ गावाचा हा सुपुत्र / सुकन्या आपल्या कार्यकर्तृत्वाने सदैव आमच्या हृदयात राहील.