आम्ही लऊळकर
आम्ही लऊळकर
लऊळ गावाची डिजिटल ओळख
← गॅलरी
📷 उत्सव

ज्ञानदीप अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन

📅 30 Aug 2026 📷 4 फोटो
ज्ञानदीप अभ्यासिका, लऊळ येथे मुंबई क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक सन्माननीय रविंद्र मांजरे साहेब यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्पर्धा परीक्षेच्या तयारीबाबत बहुमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी, त्या अडचणींवर मात करण्याचे मार्ग, अभ्यासाचे नियोजन आणि यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या सातत्याबाबत साहेबांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच मोठा फायदा होईल, अशा भावना उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यक्त करून साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले. यावेळी कुलदीप बोडके सर आणि नीलकंठ लोकरे सर यांची श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर येथे शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल रविंद्र मांजरे साहेबांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच नवनियुक्त पोलीस कॉन्स्टेबल प्रीतम लोकरे साहेब आणि योगेश लोंढे साहेब यांनी आयआयटी मद्रास येथे शिक्षण पूर्ण करून हैदराबाद येथे झालेल्या निवडीबद्दल त्यांचाही सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमास विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. संजय बापू लोकरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक श्री. सिद्धेश्वर घुगे, श्री. संतोष गवळी साहेब, पत्रकार श्री. कालिदास जानराव साहेब, श्री. किरण भोंग साहेब यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ज्ञानदीप अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, प्रेरणा आणि संधी मिळत राहो आणि लऊळमधून अधिकाधिक विद्यार्थी विविध क्षेत्रांत यश संपादन करोत, हीच सदिच्छा. आम्ही लऊळकर https://amhilaulkar.com
📷 फोटो (4)
📤 हा अल्बम शेअर करा
WhatsApp वर शेअर करा