आम्ही लऊळकर
आम्ही लऊळकर
लऊळ गावाची डिजिटल ओळख
← गॅलरी
📷 गावाची दृश्ये

प्रयास फाऊंडेशनतर्फे लऊळच्या गुणवंतांचा सन्मान — नीलकंठ लोकरे सर, कुलदीप बोडके सर, कोमल पंकज चव्हाण मॅडम, प्रीतम लोकरे, पत्रकार दिनेश शिंदे, आदित्य जोशी आणि दत्ता मामा वाघमारे यांच्या कर्तृत्वाचा गौरव.

📅 01 Sep 2026 📷 10 फोटो
प्रयास फाऊंडेशनतर्फे लऊळच्या गुणवंतांचा सन्मान सोहळा लऊळ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सोलापूर जिल्हा युवक सरचिटणीस तथा प्रयास फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब नलवडे यांच्या वतीने लऊळ येथे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी शिक्षक म्हणून निवड झालेले नीलकंठ लोकरे सर, कुलदीप बोडके सर आणि कोमल पंकज चव्हाण मॅडम, तसेच एस.आर.पी.एफ.मध्ये नियुक्ती झालेले प्रीतम लोकरे, लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष तथा पत्रकार दिनेश शिंदे, MBBS मध्ये निवड झालेला आदित्य जोशी आणि रेल्वे विभागातून सेवानिवृत्त दत्ता मामा वाघमारे यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी संतोष नाना गवळी आणि बापूसाहेब नलवडे यांनी उपस्थित गुणवंतांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विविध क्षेत्रांत लऊळच्या युवकांनी आणि नागरिकांनी मिळवलेले यश हे गावासाठी अभिमानाची बाब असून, अशा गुणवंतांचा सन्मान इतरांनाही प्रेरणा देणारा ठरतो, असे यावेळी उपस्थितांनी सांगितले. कार्यक्रमास डॉ. धनंजय नलवडे, दत्ता मामा वाघमारे, धनाजी गवळी, संतोष नाना गवळी, नीलकंठ लोकरे सर, पैलवान गोविंद नलवडे, बालाजी नलवडे, बबन धुमाळ, मुकुंद नलवडे, गणेश नलवडे, पंकज चव्हाण सर, कुलदीप बोडके सर, पोलीस प्रीतम लोकरे, पांडुरंग लोकरे, नानासाहेब जोशी, करीम बागवान यांच्यासह प्रयास फाऊंडेशनचे पदाधिकारी व संचालक उपस्थित होते. लऊळच्या विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव करण्याची ही परंपरा अशीच पुढे सुरू राहावी आणि गावातील नव्या पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी, हीच अपेक्षा. – टीम 'आम्ही लऊळकर'
📷 फोटो (10)
📤 हा अल्बम शेअर करा
WhatsApp वर शेअर करा