📢 सूचना
बँक ऑफ इंडिया, लऊळ शाखेच्या कर्जमाफी यादीमध्ये नावे असलेल्या सर्व ग्राहकांना कळविण्यात येते की, त्यांनी कोणत्याही "आपले सरकार सेवा केंद्र" येथे जाऊन खालीलप्रमाणे आधार प्रमाणीकरणाची कार्यपद्धती पूर्ण करावी.
"आपले सरकार सेवा केंद्रावरील आधार प्रमाणीकरणाची कार्यपद्धती"
१. माहिती सादर करणे
शेतकऱ्याने केंद्र चालकाला आधार क्रमांक किंवा कर्जमुक्ती यादीतील विशिष्ट क्रमांक द्यावा.
२. Agristack वर तपासणी
केंद्र चालकाने दिलेल्या क्रमांकावरून शेतकऱ्याची Agristack पोर्टलवर नोंदणी आहे का ते तपासावे.
३. नोंदणी नसल्यास नोंदणी करणे
जर नोंदणी नसेल तर केंद्र चालकाने तिथेच Agristack पोर्टलवर नोंदणी करावी.
४. कर्ज खात्याचा तपशील घेणे
नोंदणी झाल्याची खात्री झाल्यावर शेतकऱ्याचे कर्ज खात्याचे तपशील घ्यावेत.
५. तपशील खात्री करून घेणे
स्क्रीनवर दिसणारा आधार क्रमांक, कर्ज खाते क्रमांक आणि रक्कम शेतकऱ्याकडून खात्री करून घ्यावी.
६. बायोमेट्रिक प्रमाणीकरण
शेतकऱ्याने सर्व माहितीस सहमती दिल्यावर बोटाचा ठसा/OTP ने प्रमाणीकरण करावे. 'Agree' आणि 'Submit' करून मिळालेली पावती शेतकऱ्याला घ्यावी.
७. आधार क्रमांकाबाबत असहमती असल्यास
मूळ आधार कार्ड तपासून योग्य क्रमांक नोंदवा आणि प्रमाणीकरण करा. जर आधार चुकीचा असेल तर तक्रार नोंदवून तहसीलदार समितीकडे पाठविण्याची माहिती घ्या व पावती घ्या.
८. कर्ज रकमेबाबत असहमती असल्यास
आधी बायोमेट्रिक प्रमाणीकरण करा. मग असहमतीची नोंद करा. तक्रार जिल्हास्तरीय समितीकडे जाईल, याची माहिती घ्या आणि पावती घ्या.
९. प्रमाणीकरण न झाल्यास
एका बोटाने न झाल्यास इतर बोटांनी २–३ वेळा प्रयत्न करा. तरीही "Unable To Authenticate" आल्यास केंद्र चालकाने स्वतःच्या बोटाने प्रमाणीकरण करावे. त्याची तक्रार तहसीलदारांकडे नोंदवावी आणि पावती घ्यावी.
👤 अनुप नलवडे यांनी नोंदवले
· 📞 7387936995
27 जुलै 2026